चला, देश सुधारुया 

सोने की चिडिया

सोने की चिडिया

मागच्या लेखात आपण पाहिले की ब्लॉग्समुळे प्रसार माध्यमांचे लोकशाहीकरण झाले. आता लेखक, बातमीदार आणि प्रकाशक होणे हे कोणाही सामान्य माणसाच्या आवाक्यात आले आहे. आपण हेही पाहिले की ही शक्ती लोक आपल्या कळकळीच्या कोणत्याही कार्याकरता वापरू शकतात. किंबहुना अनेक लोकांची ब्लॉग लिहिण्या मागची ही एक प्रबळ प्रेरणा असते. पुढचे काही आठवडे आपण अशा वेगवेगळ्या प्रेरणांनी भारलेल्या ब्लॉग्सचा आढावा घेणार आहोत.

स्वत:ची परिस्थिती बदलणे, आपल्या कुटुंबाचे भले करणे ही सर्वच  लोकांची मनापासून इच्छा असते. मात्र समाजाचे किंवा देशाचे कल्याण करण्यची अंत:स्फूर्ती काही मोजक्याच व्यक्तींच्या ठायी असते. त्याकरता त्यांना आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्याची , त्यांची मनस्थिती  बदलण्याची  त्यांना भारून टाकण्याची आवश्यकता असते.आणि ह्यासाठी सभा, भाषणे किंवा वैचारिक लेखन हे प्रस्थापित मार्ग नेते अवलंबतात. आपले विचार जन सामान्यांपर्यंत पोचवाण्याकरता टिळकांनी केसरी चालू केला, आगरकरांनी सुधारक तर महात्मा गांधींनी यंग इंडिया आणि हरिजन. ह्या सर्व नेत्यांना तेंव्हाचे जग, तत्कालीन देशांतर्गत परिस्थिती  बदलायची होती. साहजिकच त्यांचे विचार, भाषा ही प्रस्थापित परिस्थितीच्या विरुद्ध, anti-establishment,  अशी होती.

आजचे लीडर्स, नेते सहजच सोशल मिडियाचा उपयोग करतात आणि त्यांचे anti-establishmen विचार प्रकट करतात. नुकत्याच झालेल्या अरब राष्ट्रांमाधल्या उठाव मध्ये, “अरब स्प्रिंग” मध्ये, २०११ सालच्या अण्णा हजारेंच्या लोकपाल चळवळीमध्ये किंवा अलीकडेच झालेल्या “निर्भया” दिल्ली बलात्कार प्रकरणातील इंडिया गेट निदर्शनांमध्ये फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉग्स चा खूपच मोठा सहभाग होता.

आज आपण एका “देश सुधरण्याचा” ध्यास घेतलेल्या, भारत देशाला पुन्हा वैभवशाली बनवण्याचा विडा उठवलेल्या  “मराठी माणसाच्या” ब्लॉगला भेट देऊया.

सत्यमेव जयते

ब्लॉगचे नाव आहे “सत्यमेव जयते”(http://satyameva-jayate.org/), आणि ब्लॉगकर्ता आहे शंतनू भागवत उर्फ बी. शंतनू. ब्लॉगची tagline, श्रेयपंक्ती आहे “डेडीकेटेड टू भारत एंड धर्म”, “भारताला आणि धर्माला वाहून घेतलेला”.

शंतनू १९९१ च्या batch चा भारतीय विदेश सेवेतला, IFS मधला सनदी अधिकारी होता. त्या निमित्ताने त्याने परदेशात, विशेषत: जपानमध्ये बराच काळ व्यतीत केला. त्यानंतर त्याने लंडन मध्ये अमेडीअस ह्या (Amadeus)  venture capital फर्म मध्ये सात वर्षाहून अधिक काळ काम केले.  सध्या शंतनू ब्लॉग लिहिणे आणि देश सुधारणेचे प्रयत्न करणे या व्यतिरिक्त  नव्या व्यवसायांना आणि व्यवसायिकांना आणि नव अद्योजकांना सल्लागार म्हणून काम करतो.

हा ब्लॉग ह्याच नावाच्या, आणि ह्याच उद्दिष्टाच्या आमीर खानच्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या बऱ्याच  आधी, जुलै २००४ मध्ये चालू झाला. सुरवातीच्या काळातले पोस्ट्स हे अनियमित व भारतीय इतिहास, भारतातली मुघल राजवट, हिंदू धर्म आणि त्याबद्दल चा गैरप्रचार व गैरसमज इत्यादी विषयांबद्दल होते. बरेचसे पोस्ट्स हे इतरांनी लिहिलेल्या लेखांचे पुनर्प्रकाशन किंवा त्यांचावरची टिप्पणी अशा स्वरूपाचे होते.

शंतनू त्याची ओळख करून देणाऱ्या ३० ऑक्टोबर २००८ च्या पोस्ट मध्ये म्हणतो “ह्या महान देशात जन्मल्याचा मला अभिमान आहे आणि आत्ता पर्यंत मिळालेल्या संधी मला मिळणे हे माझे अहोभाग्य आहे. पण माझ्या देश बांधवांचे काय? त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा एक अस्तित्वाचा लढा म्हणून उगवतो. हे असे का? आणि हे असे घडत असताना तुमच्या आमच्या सारखे नशीबवान स्वस्थ बसून कसे राहू शकतात?”

सुरवातीला असे वाटल्यावर आपल्या प्रमाणेच शंतनू त्याच्या मित्रांशी बोलून, किंवा काही ब्लोग पोस्ट्स लिहून आपले मन हलके करीत असे. फारच उद्विग्नता आली असली, तर एखादे चांगले कार्य शोधून त्याला देणगी देत असे.

“लवकरच माझ्या लक्षात आले की सद्य परिस्थितीवर हा उपाय कुचकामी आहे. तो काही काळ मन:शांती देईल, पण प्रश्न तसेच राहतील. सर्व प्रश्नाचे मुळ हे आपल्या राजकारणात आणि राज्यकारभारात (governance ) आहे. आणि जोवर तो सुधारत नाही, तोवर परिस्थिती बदलणार नाही. सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनाच्या धकाधकीतून वेळ मिळत नाही आणि जोम उरत नाही. पण आपल्या सारख्या सुदैवी लोकांचे काय? आपण आपली जबाबदारी विसरलो आहोत. फक्त स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला आपण देशभक्त बनतो. इतर दिवशी काय? आणि मग २२ ऑक्टोबर २००८ ला “cash for votes” स्कॅम घडला. ते जणू भारताचे जाहीर वस्त्रहरणच होते.  आणि मी खडबडून जागा झालो”

संजीव सभलोक ह्या आणखी एका देश सुधारण्यसाठी वाहून घेतलेल्या ब्लॉगरच्या सहकार्याने त्यांनी फ्रीडम टीम ऑफ इंडिया (FTI) ह्या ट्रस्ट ची स्थापना केली.  संजीव सुद्धा पूर्वाश्रमीचा सनदी अधिकारी, IAS ऑफिसर आहे. ह्या दोघांनाही सरकारी कार्यापाध्तीची आणि प्रशासनाचे संपूर्ण ज्ञान आहे. ह्या ट्रस्टचे अंगीकृत कार्य आहे “आपल्या स्वप्नातला भारत निर्माण करणे. एक देश ज्याला आपल्या प्रामाणिक पणाचा अभिमान आहे, जो अत्यंत संपन्न आहे आणि ज्याला बाकीचे जग land of opportunities म्हणून ओळखते.” ह्याच्या करता एफटीआय १५०० सुशिक्षित, उदारमतवादी, तत्वनिष्ठ  आणि निवडणुकीच्या राजकारणात भाग घेणाऱ्या लोकांची टीम तयार करण्यास कटीबद्ध आहे. नुकतीच, १६ आणि १७ फेब्रुवारीला एफटीआयचे चौथे अधिवेशन दिल्लीत भरले होते. ह्याबद्दलची अधिक माहिती http://freedomteam.in/ येथे मिळू शकते.

ह्याच प्रयत्नातून चालू झालेले आणखी एक कार्य “सोने की चिडिया” (http://sonekichidiya.in/). भविष्यातला भारत कसा असेल आणि आपण तेथे कसे पोहोचू ह्याच्या संबधीच्या विचारांच्या देवाणघेवाणी साठी निर्माण केलेले एक व्यासपीठ आहे. ह्या नावाचा उगम आहे “जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती हो बसेरा, वो भारत देश ही मेरा” हे वैभवशाली भारताचे वर्णन करणारे सिकंदर ए आझम ह्या चित्रपटातील गीत!  ५ ते ८ एप्रिल दरम्यान त्यांनी एका राष्ट्रीय उत्थान शिखर संमेलनाचे आयोजन हरिद्वार येथे केले आहे.

शंतनू आणि संजीवने हाती घेतलेले कार्य अवघडच आहे, पण त्यांच्या ब्लॉग्स शिवाय हे आणखीच कठीण झाले असते.  शंतनूला त्याच्या कार्याकरता आपल्या शुभेच्छा व्यक्त करून आता आपण ब्लॉगच्या काही तांत्रिक गोष्टींकडे वळूया.

प्रत्येक ब्लॉग करता अत्यंत महत्वाचे असते त्याचे मुखपृष्ठ, होमपेज. जर तेच आकर्षक आणि समजण्यास सोपे नसेल, तर लवकरच वाचक तिथून पळून जाईल. सत्यमेव जयते ह्या  ब्लॉगचे होमपेज वेधक आणि नीटनेटके आहे. ब्लॉगच्या banner खालीच असलेला  मेनूबार वाचकाला सहजपणे ब्लॉगच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रवेश करू देतो. त्याच्या खालची जागा दोन columns मध्ये विभागली आहे. डावीकडचा रुंद column सर्वात ताजा लेख, हेडलाईन दाखवतो, तर उजवीकडे महत्वाच्या, featured, पोस्ट्सच्या लिंक्स  दाखवतो.

आजकाल प्रत्येक ब्लॉग फेसबुक आणि ट्विटरची मदत आपल्या ब्लॉगच्या प्रसाराकरता घेतो. हा ब्लॉगही त्याला अपवाद नाही. डावीकडच्या column  मध्ये ब्लॉगरच्या ताज्या ट्विटस आणि ब्लॉगचे निवडक fans च्या छब्या दिसतात. त्यांच्यावर टिचकी मारल्यास आपण ब्लॉगच्या फेसबुक किंवा ट्विटर पानावर पोचतो.

हा ब्लॉग  चालू झाल्यापासून आत्तापर्यंत १२०० पेक्षाही जास्त पोस्ट्स त्यावर प्रसिद्ध झाले आहेत. ह्यातले बहुतेक सगळे पोस्ट्स शंतनूने लिहिले आहेत, तर काही गेस्ट पोस्ट्स आहेत, जे शंतनूने आमंत्रित केलेल्या लोकांनी लिहिले आहेत. मागच्या लेखात आपण पहिले होते की ब्लॉग्स चर्चेची संधी देतात. ह्या ब्लॉग वर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालते हे त्यावर असलेल्या १६,००० हून जास्त comments वरून, अभिप्रयांवरून स्पष्ट आहे.

जेंव्हा एखाद्या ब्लॉगवर एवढया मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण होते, तेंव्हा आपल्याला हवे असलेले साहित्य मिळवणे अतिशय अवघड होते. ही समस्या ब्लॉग्स कसे सोडवतात हे आपण आता पाहू.

ब्लॉगकर्ता  प्रत्येक लेखाचे काही ठराविक गटांमध्ये, categories मध्ये वर्गीकरण करतो. “सद्यस्थिती”, “ताज्या बातम्या”,  “भारतीय इतिहास”, “हिंदू धर्म”, “भारतीय राजकारण”, “जागतिक राजकारण”, “आरक्षण आणि सकारात्मक कृती” हे शंतनूच्या ब्लॉग  वरचे काही गट. साहजिकच एक लेख अनेक गटांमध्ये मोडू शकतो आणि तो पोस्ट करतांना लेखक त्याला सगळ्या संबंधित गटांमध्ये वर्गीकृत करतो.

शंतनूच्या ब्लॉगवर उजव्या हाताच्या column मध्ये categories ची, गटांची एक dropdown लिस्ट आहे. त्यामध्ये categories अकारविल्हे (alphabetically) दिलेल्या आहेत, आणि प्रत्येक category च्या पुढे त्या गटात किती लेख आहेत हेही दिले आहे. आपल्याला हवी असलेले category निवडली, की आपल्याला संबंधित लेख मिळू शकतात. ह्या शिवाय आपण archives च्या dropdown मधून विशिष्ट काळात प्रसिद्ध झालेले लेख बघू शकतो. त्याचप्रमाणे उजव्या हाताला वर असलेल्या सर्चचाही वापर करू शकतो.

आज आपण इथेच थांबू. आपल्या अभिप्रायांच्या आणि सूचनांच्या प्रतीक्षेत.

Advertisements
This entry was posted in Current Events, General, People and tagged , , , , . Bookmark the permalink.

3 Responses to चला, देश सुधारुया 

 1. B Shantanu says:

  Thanks so much Makarand!!
  माझा पुणे आणि मुंबई इथे २-३ महिन्यात चक्कर लागतो..
  आपला फोन नंबर pl माझ्या इमेल वर पाठवा JaiDharma AT gmail.com
  Hopefully we will meet soon!
  जय हिंद, जय भारत! शांतनु

 2. B Shantanu says:

  प्रिय मकरंद, || सत्यमेव जयते || विषयी हया ब्लॉग-पोस्ट साठी आभार..Pl join us in this fight to “Reclaim India”!
  जय हिंद, जय भारत!

  • शंतनू

   हा ब्लॉग लिहितांना मला स्वत:ला खूप आनंद झाला. हाच पोस्त थोड्या वेगळ्या स्वरुपात ७ एप्रिलला महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झाला. ही लिंक चेक करा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19421629.cms

   मी लवकरच आपल्या कार्यात सहभागी होईन.

   मकरंद

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s