स्टीव्ह जॉब्स “इनसेनली ग्रेट!”

jobs-steve-ipad-economist-coverस्टीव्ह जॉब्स गेला! जवळपास गेली सहा सात वर्षे तो कन्सरशी झुंज देत होता. तरीसुद्धा ती बातमी साऱ्या जगाला धक्का देऊन गेली. तो एक किमयागार होता. या ना त्या प्रकारे त्याने सर्वांच्या आयुष्याला प्रभावित केले.

२००५ साली स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कमेन्समेंट अँड्रेसमध्ये तो म्हणाला, “मी लवकरच मरणार आहे ह्याची जाणीव मला महत्वाचे निर्णय घ्यायला मदत करणारे अस्त्र आहे”. आणि तो त्याचे आयुष्य प्रत्येक क्षण अखेरचा असल्याप्रमाणे जगाला.

त्याने पर्सनल कॉम्पुटर (जीयुआय आणि माउस) आणि टेलीकॉम (आयफोन) क्षेत्रात केलेली कामगीरी सर्वज्ञात आहे. पण इतरही बऱ्याच क्षेत्रात (संगीत, सिनेमा इत्यादी)त्याने बहुमोल कार्य केले.

आयपॉड आणि आयट्युन्सच्या मदतीने त्याने संपूर्ण संगीत वितरणाचे (music distribution) क्षेत्र बदलून टाकले.पूर्वीपासून एका आवडत्या गाण्यासाठी संपूर्ण रेकॉर्ड घेणे भाग पडत असे. याचा आणि mp3 च्या वाढत्या प्रसाराचा परिणाम संगीताच्या राजरोस चोरीमध्ये, पायरसीमध्ये होऊ लागला आणि संपूर्ण म्युझिक इंडस्ट्रीच धोक्यात पडली. अशावेळी स्टीव्ह जॉब्सने म्युझिक इंडस्ट्रीचे मन, ९९ सेंट ला एक गाणे, ह्या प्रमाणे विकण्यास वळवले. आणि अश्याप्रकारे आयट्युन्सच्या जगातले सर्वात मोठे म्युझिक स्टोर बनले.

ल्युकासफिल्म्सचा एक भाग विकत घेऊन स्टीव्हने १९८६ साली पिक्सार ची स्थापना केली. आज आपल्याला पिक्सार हि गेल्या १५ वर्ष्यातल्या सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म्स (थ्री टॉय स्टोरी मुव्हीज, फाइंडिंग नेमो etc.) करता ठाऊक आहे.

अॅप स्टोअर च्या माध्यमातून स्टीव्हने सॉफ्टवेअर वितरणाचाचा बिझिनेस पूर्णपणे बदलून टाकला. नॉर्मली सॉफ्टवेअर हे डिस्कवर किंवा कार्डवर मिळत असे. ते डेस्कटॉप च्या माध्यमातून केबल वापरून फोनवर इन्स्टाल करावे लागत असे. एकंदरीतच हा अत्यंत कठीण आणि सर्वसामान्य लोकांसाठी अवघड प्रकार होता. शिवाय यातून व्हायरस पसरण्याचा धोकाही होता. स्टीव नेहमीच ग्राहकांकरिता गोष्टी सोप्या करण्याचा हट्ट (त्याच्या इंजीनीर्स च्या मते दुराग्रह Smile) धरत असे. त्याने आयफोन करता सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन सोपे करण्याचा चंग बांधला. मग काय. आले स्टीवच्या मना तेथे काहीच चालेना. अॅप स्टोअरचा जन्म झाला.

आयफोनच्या सर्व सोफ्टवेर करता अॅप स्टोअर हे एकमेव ठरले. ज्या ग्राहकाला एखादे सॉफ्टवेअर हवे असेल, तो ते शोधून डायरेक्ट आपल्या फोनवर डाउनलोड करून घेतो. जर त्याच्या करता पैसे देण्याची गरज असेल, तर ते क्रेडीटकार्डमार्गे देता येतात. आणि हे सगळे कॉम्पुटर किंवा केबल शिवाय. आजमितीस ‘अॅप स्टोअर’मध्ये १० लाखांहून जास्त प्रोग्राम्स उपलब्ध आहेत.

आणि दोन वर्ष्यापुर्वी iPad च्या माध्यमातून त्याने ‘टॅबलेट’ जन्माला घातली. आत्तापर्यंतचे सर्व कॉम्पुटर कॉम्प्लिकेटेड होते. सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड, माउस अबब! एखद्या नवख्याला पूर्णपणे गोंधळूनच जायला व्हायचे. कुठे हात लावला, तर काय होईल हे कळण्यात काही दिवस निघून जायचे. त्यातून सारखी धाकधूक. मी करतोय ते बरोबर आहे ना?काही बिघडणार तर नाही!! स्टीव्हने हेही सोपे करायचे ठरवले आणि आयपॅड जन्माला आले.

एक साधी पाटी आणि फक्त एक मोठे बटण. प्रोग्राम वापरायला पाटीवर स्पर्श करायचा. याहून सोपे काय असू शकते. माझ्या ८० वर्ष्याच्या आईला बऱ्याच काळापासून कॉम्पुटर वापरायला शिकायचे आहे. मी जेंव्हा पहिल्यांदा आयपॅड बघितला तेंव्हा माझ्या मनात आले, “हा कॉम्पुटर आई नक्की वापरू शकेल”.

आणि आता अद्ययावत टेक्नोलॉजी सहजपणे वापरण्यातील एक नवीन क्रांती. नव्या आयफोनमध्ये सिरीच्या मदतीने आपण फोनशी बोलून आपली कामे करून घेऊ शकतो. (जास्त माहितीकरता सिरीवर टिचकी मारा. त्या पानावरचा विडीओ नक्की पहा.)

बिल गेट्सच्या मायक्रोसोफ्टने प्रत्येक टेबलवर कॉम्पुटर आणणे शक्य केले, तर स्टीव्हने ही सर्व हायटेक्नॉलॉजी लोकाभिमुख केली.

जर स्टीवच्याच शब्दात त्याचे वर्णन करायचे असेल तर मी म्हणेन, “इनसेनली ग्रेट!”

(हाच लेख आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये थोड्या वेगळ्या स्वरुपात प्रसिद्ध झाला.  लेख स्टीव्हच्या सर्वज्ञात कामगीरी बद्दल न लिहिता त्याच्या काहीशा अज्ञात गोष्टींबद्दल हवा होता.)

Advertisements
This entry was posted in People, Science / Technology and tagged , . Bookmark the permalink.

4 Responses to स्टीव्ह जॉब्स “इनसेनली ग्रेट!”

  1. shrikant says:

    stive jobs is great………..

  2. kapil says:

    Apratim !!!!!!

  3. Tejraj says:

    खूप छान वर्णन केलेत सर!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s